संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. आई-बापांनी त्यांचे नाव डेबू ठेवले.
डेबूजीच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई डेबू ला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. कोणतेही काम मनापासून करण्याची डेबुला हौस होती. काम करायचे ते अगदी नीटनेटके हात झाला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे, अशी त्याची काम करण्याची पद्धती होती.
काबाडकष्ट करणारे असंख्य लोक असतात. त्यांचे दुःख, दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता. तो ज्या समाजात वावरत होता, त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते. हे लोक व्यसनांमुळे कर्जबाजारी होते. ऋण काढून सण करत होते. डेबुला हे आवडत नव्हते. लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता. लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबुला एक वेगळाच अनुभव आला. चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कोणीही ऐकत नाही, आपल्या शब्दाला वजन नाही. आई आपल्यासाठी राबते, कष्ट ते म्हणून आपण तिचे एकतो. गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले, की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे एक तिल. त्यांच्यात सुधारणा होईल.
वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा, सगळ्या सोयरे यांचा त्याग केला. सगळी माणसे हे आपले सगेसोयरे, सगळे विश्व हेच आपले घर, असे मानून ते वावरु लागले. गावोगाव भजन-कीर्तन करत ते फिरू लागले. समाजात लोकांत जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत. त्याबद्दल आपण दंड ठेवला पाहिजे अशी त्यांची भावना होती.
बाबा कसे दिसतात. डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग. अंगात फटका पण स्वच्छ सदरा. जाडजूड धिप्पाड देह. नेसायला एक लुंगी. एका पायात कापडाचा बूट, तर दुसरा पाय अनवाणी. हातात एक काठी आणि एक गाडगे. हात सदा नमस्कारासाठी जोडलेले, पण दुसरा कोणी पाय धरू लागला तिथे पसार होत. त्यांच्याजवळ सतत घाडगे असायचे. म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणतात.
घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाही. भिक्षा मागायची आणि गाड्यात जे पडेल ते खायचे. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाही. चिंध्या घातल्या पांघरलेल्या, झोपायला फक्त एक तर अट किंवा घोंगडी आणि उशाला हाताची घडी. कुणाकडे भीक मागायला चालेल तर त्यांनी म्हणावे तू तर चांगला धडधाकट आहेस. माझ्या घरची लाकडे फोडून दे मग देतो तुला भाकर. बाबांनी म्हणाले द्या कुऱ्हाड. कुऱ्हाड हाती आली की धना धन ढलप्या काढून घाम गाळावा. मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुर्हाड ठेवून पसार व्हावे बाबांचा पत्ता लागायचा नाही. तहान-भूक याची पर्वा कोण करतो, भजन-कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास.
गाडगेबाबांच्या किर्तनाला दहा दहा हजार लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोके ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. ते कुणाला पाया पडून देत नसत. कीर्तन संपले संपले, की आरती च्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात. लोकांनी सद्गुन शिकावे माझ्या पाया पडून उपयोग नाही.
असे त्यांचे म्हणणे असे. कीर्तनात ते सांगाय चे काय? कळवळून ते म्हणायचे, बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरां नो अरे देव आपल्यातच आहे. त्याला जागं करा. हा उपदेश करत गावेच्या गावे शहराच्या शहरे घाडगे बाबांनी पायाखाली घातली. बाबांचा एक नियम होता तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी ज्या वस्तीत जात तेथे खराटे फावडी घमेली मागवत. मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई. या गर्दीत कुणी पाया पडायला आला, एक तडाखा देऊन बाबा म्हणत तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडतात. व्हा बाजूला. बघा हे गाव कसं साज र गोजर दिसत आता.
तुम्ही पंढरपूर पाहिली आहे का? नाशिक बघितले आहे? अनु देहू? आणि आळंदी? महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेला त तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून कष्ट करून मदत मागून धर्मशाळा बांधल्या. काही नद्यांवर घाट बांधले पाणपोया उघडल्या. गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली. मुलांसाठी शाळा, महाविद्यालय, वसतिगृहे उभी केली. दुःख दिसले की बा बा तिथे धावत. दुष्काळ पडला लोकांना झाले की बात तिथे हजर. स्वतः रा लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायची. त्यातून अन्न वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. उजाड गावी उभी व्हायची. त्यांनी जात मानली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ अपंग व दुखी लोक रंजल्या गांजल्या ची सेवा हीच बाबांची देवपूजा.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post