नवोदय विद्यालय Online Exam विषय:भाषा
उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
राजा नासिरुद्दीन दयाळू अंत:करणाचा व कोमल मनाचा म्हणून प्रसिद्ध आहे. जरी तो राजा असला, तरी राज्याच्या खजिन्यातून तो स्वत:च्या वैयक्तिक खर्चासाठी एकही पैसा घेत नसे. पैसे मिळवण्यासाठी तो मुलांना शिकवीत असे.एकदा स्वयंपाक करीत असता त्याच्या पत्नीचा हात भाजला, वेदना असहय होती. ती नासिरुद्दीनकडे धावली आणि रडत म्हणाली, " पाहा, माझा हात भाजला आहे. तुमच्यासारखा श्रेष्ठ राजा स्वयंपाकी ठेवू शकत नाही का? " नासिरुद्दीन हसला आणि सौम्यपणे उत्तरला, "राणीसाहेब, राज्याचा खजिना माझा नाही, हे विसरू नका. तो माझ्या प्रजेच्या मालकीचा आहे. आपल्या वैयक्तिक वापराकरिता एक पैसाही घेणे हे पाप होईल." या उत्तराने राणी गप्प झाली आणि ती शांतपणे स्वयंपाक घरात गेली .
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post