नवोदय विद्यालय Online Exam विषय:भाषा
उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
कन्याकुमारी चे एक सुंदर स्थान आहे. ते तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. देशाच्या अनेक भागातले यात्रेकरू येथे तीन समुद्रांच्या संगमाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आणि मंदिरात पूजा करण्यासाठी येतात. कन्याकुमारी भोवतालचा समुद्र सर्वसाधारणपणे शांत असतो, भेट देणाऱ्या अनेकांना जाणवले आहे की, या जागी एक विशिष्ट शांतता आणि स्तब्धता सदैव वसते. या ठिकाणच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळा या सर्वोत्तम वेळा होत. सूर्य सकाळी बंगालच्या उपसागरात तुन उगवतो आणि संध्याकाळी अरबी समुद्रात मावळतो. खरंतर भारतात हे एकच असे ठिकाण आहे की, जेथून सूर्य समुद्रातून उगवताना आणि समुद्रात मावळतांना पाहता येतो. कन्याकुमारीला येणारे अनेक जण पौर्णिमेच्या दिवशी येतात. त्यांना दोन अग्नि गोला सारखे दिसनारे अरबी समुद्रात बुडणारा सूर्य आणि बंगालच्या उपसागरातून व येणारा चंद्र एकाच वेळी पाहता येतात.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post