नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 19
उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकाम
करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रायंना
शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धाअधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस
स्त्री-शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत
आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच
जबाबदारीच्या कामांत त्यांना मदत करीत आहेत.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post