नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 19
उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
आपण जेथे पाहू तेथे परमेश्वरच आहे. परंतु आपण आंधळे आहोत. आपण झाडामाडांतच देव पाहतो. परंतु मानवातील देव
आपणांस दिसत नाही. आपणांस तीन तोंडांचा, आठ हातांचा असा देव पाहिजे असतो. मनुष्याहून काही निराळा देव आपणंस हवा
असतो. मनुष्याच्या रूपाने आपल्याशेजारी उभा असलेला परमेश्वर आपणांस दिसत नाही. या मानवाजवळ आपण भांडतो त्याला
आपण गुलाम करतो. त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करू पाहतो. भगवंतांना याचे आश्चर्य वाटते. अरे, मनुष्यातील देव
आधी पाहा. हा बोलता-चालता देव आहे, याचे स्वरूप बघा, याला काय हवे-नको ते पाहा. दगडाच्या देवाला काय आवडते, हेही
आपण ठरवून टाकले आहे. गणपतीला मोदक आवडतो, विठोबाला लोणी आवडते. खंडोबाला खोबरे हवे, परंतु मानवाला काय हवे
याची विवंचना आपण कधी करतो काय ? आपल्या सभोवती हा दोन हातांचा देव उभा आहे. त्याच्या पोटात अन्न नाही. त्याच्या
अंगावर बस्त्र नाही, त्याच्या पूजेला येतो का धावून?
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post