नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 24
उतारा 24
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजा मुले स्त्रिया पुरुष सगळे लुटतात.शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य आणि आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते.सकाळी सकाळी शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्यांचे टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर भरून टाकतात. बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्या मेंढ्या गाई म्हशी आणि कोंबड्या ही बरोबर घेतात. त्यांना बाजारातून वस्तू विकत घ्यायच्या असतात.त्यांना कपडे आणि मसाले तसेच किती तरी घरगुती जिन्नस हवे असतात. त्याच्या शेताजवळ ज्या गोष्टी सहज उपलब्ध नसतात. बांगडी विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात. शेकोट्या पेटवल्या जातात. भाजी पुरी आणि भाज्या बनवले जातात. समोसे आणि उसाचा रसही फार लोकप्रिय असतो. मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागडत असत. मुले झोपाळ्यावर आणि मेरी गो राऊंड मध्ये बसतात. प्रत्येकाला बाजारचा दिवस प्रिय असतो.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post