• Breaking News

    विद्या परम दैवतम् .

    I have shared e learning materials for primary schools Maharashtra. That have online test for kids and other materials for school in Maharashtra

    Monday, August 31, 2020

    वडेश बहरला इयत्ता दुसरी भाषा (Learn online )

    वडेश बहरला

    वडेश बहरला

    चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणूकाही
    आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदी फांदी वर पानेच पाने होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली
    थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची .झाडावर चिमणी कावळा खारुताई मैना राघू यायचे. किलबिल करत बोलायचे, गोड गाणी

    गायचे. वडेश. पाखरांची भाषा समजायची . तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा .

    पाखरांना पिले होती. चिमणी ची पिलू होते चिनू कावळीनीचे पिल्लू होते कानू .पोपटाचे पिल्लू होते पिनु . पिले लपाछपी खेळत.
    पारंबी बघून झोके घेत. खूप दंगा करत. दुपारी वडेश झोप मोडायची .तो वैतागून जायचा पिलांवर रागवायचा. पिलांना सांगायचा.
    उडा उंच भुरभुर

    जा खूप दूर दूर

    करता खूप कटकट

    निघा येथून झटपट

    पिलांना वाडेशचा राग यायचा .ती वाडेशचे नाव आई-बाबांना सांगायची .नेहमी नेहमी पिलांचे बोलणे एकूण पाखरांना वडेशचा रागा आला
    अचानक पाखरे दूर निघून गेली.


    इथे कोणी बघायला नाही . कोणी खेळायला नाही . आता काय करावे ? वाडेशला एकटे एकटे वाटू लागले .

    हिवाळा संपला.ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले, ते हळूहळू मोठे झाले . मग पोपटी होत गेले. कोवळी पाने दिसू लागली .
    पाने हिरवीगार झाली . फांदी फांदी वर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले .ते हळूहळू लालसर झाले . मग फळे लाल चूटुक झाली .
    जाता-येताना पाखरांना फळे दिसू लागली. ती शीळ घालून वडेशला हाका मारू लागली . वडेाला पाखरांची ओढ होतीच. रुसवा संपला होता.


    तो पाखरांना बोलूवू लागला

    या रे या , सारे या

    चटकन या पटकन या

    लाल लाल फळे खाऊन जा

    पाखरे बोलू लागली ,

    येतो ,येतो पटकन येतो

    हसत नाचत चटकन येतो

    गाणी गट गट येतो .

    लाल लाल फळे खातो .....

    पाखरे वडेश जवळ आली . नवी घरटी बांधली .वडेश जवळ राहू लागली .वाडेशला खूप आनंद झाला .मोठी झालेली पिल्ले पाहून वडेश
    बहरून आला .

    No comments:

    Post a Comment

    Have any doubts please comment on post

    फेस बुक पेज ला जॉईन व्हा

    आपला अभ्यास टेलेग्राम चानलला जॉईन व्हा

    आपला अभ्यास whats app ग्रुप