नवोदय विद्यालय Online Exam विषय:भाषा
1 उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
रोबो हे एक यंत्र आहे. ते हलणारे यंत्र आहे. ते सूचनांचे पालन करते. या सूचना संगणकातून येतात. ते यंत्र असल्यामुळे ते चुकत नाही. ते दमत नाही आणि ते कधीच तक्रारी करीत नाही. काही रोबो वस्तू बनवण्यासाठी वापरले जातात. रोबो मोटारगाड्या बनवण्यात मदत करू शकतात. ज्वालामुखींचा शोध घेण्यासारख्या धोक्याच्या जागी काही रोबो वापरले जातात. काही रोबो वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात हे रोबो तुमचे घर स्वच्छ करायला मदत करू शकतात. काही रोबो तर शब्दसुद्धा ओळखू शकतात. टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. काही रोबो माणसा सारखे दिसतात. पण बरेचसे रोबो यंत्रा सारखेच दिसतात. पहिला रोबो 1954 मध्ये जॉर्ज देओल यांनी बनवला आणि त्याचे नाव ठेवले युनी मेट. मोटार गाड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला. भविष्यात आपल्याकडे अजूनही ही बरेच रोबो असतील, जे आग विझवू शकतील, युद्ध करू शकतील आणि रोग बरे करू शकतील. आयुष्य अधिक चांगले बनवण्यास ते मदत करतील.
Super
ReplyDelete