नवोदय विद्यालय navoday test विषय:भाषा भाग 19
उतारा
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता, तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर चिकटवलेल्या आहेत, अशा दिसतात. तुम्हांला आश्चर्य वाटले असेल की. त्या एकाच ठिकाणी रात्र-रात्र कशा राहतात. त्या खाली का पडत नाहीत. मजेची वस्तुस्थिती अशी आहे की, तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत. त्या आपापल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत, जशी पृथ्वी आणि इतर आठ ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात. तुम्हांला वाटते की, तारका एकाच ठिकाणी असतात. कारण तुम्हांला त्या फिरताना दिस । शकत नाहीत. याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत. त्या फिरत असूनही, आपल्याला त्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात. शिवाय, गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे, ती तारका फिरत असताना आपापल्या मार्गावर राहतील असे पाहते. ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही.
Question 1 of 5
तारका फिरताना आपण पाहू शकत नाही; कारण
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post